ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत आतापर्यंत 22 लाख 14 हजार 542 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 211 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, गुरुवारी या देशात 05 हजार 714 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 579 जणांचा मृत्यू झाला. 22.14 लाख रुग्णांपैकी 17 लाख 52 हजार 125 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 62 हजार 206 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 4798 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 59 लाख 83 हजार 144 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.