ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या देशात आतापर्यंत 10 लाख 19 हजार 543 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 104 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत गुरुवारी 3918 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 502 जणांचा मृत्यू झाला. 10.19 लाख रुग्णांपैकी 7 लाख 66 हजार 361 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 53 हजार 078 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2852 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात अकरावा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 26 लाख 49 हजार नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.