हैदराबाद
वैद्यकीय तंत्रज्ञानातील आघाडीवरची कंपनी मेडट्रॉनिक पीएलसी 1200 कोटी रुपये भारतात गुंतवणार आहे. ही गुंतवणूक कंपनी हैदराबादमधील कारखान्यात करणार असून हा खर्च संशोधन आणि विकासाच्या कार्याकरीता केला जाणार आहे. हैदराबादमधलं हे केंद्र राज्याचं आदर्श ठरावं असं अभियांत्रिकी आणि कल्पक केंद्र बनवण्याचा कंपनीचा मानस आहे. तेलंगाणा सरकारसोबत भागीदारीतून प्रकल्प राबवणार आहे. अमेरिकेनंतर हैदराबादमधील सर्वात मोठय़ा संशोधन केंद्रातून येणाऱया काळात 1 हजार जणांना रोजगार दिला जाणार आहे.