बेंगळूर : जीप इंडिया कंपनीने ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत ‘रँगलर’ ही नवी कार नुकतीच भारतीय बाजारात उतरवली आहे. स्थानिक स्तरावर उत्पादित करण्यात आलेल्या या गाडीची किंमत तुलनेने 10 लाख रुपयांनी स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रँगलरची भारतीय बाजारातील किंमत ही 53 लाख 9 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर कार उत्पादनाला प्राधान्य देण्यासाठी जीप इंडियाचा प्रयत्न असणार आहे. याच अनुषंगाने फियाटने 250 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम पुण्याजवळच्या रांजणगाव येथील कारखान्यामध्ये गुंतवण्याचे निश्चित केले आहे. याआधी 450 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक जीप इंडियामध्ये करण्यात आली आहे. स्पोर्टस् युटिलीटी व्हेईकलअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या रँगलरची किंमत आयातीत कारपेक्षा 10 लाख रुपयांनी स्वस्त आहे.
Previous Articleक्राफ्टस्मन ऑटोमेशनच्या आयपीओला प्रतिसाद
Next Article मैत्रिणीस जबरदस्तीने दारु पाजून विनयभंग
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.