मुंबई
मेक इन इंडिया या मोहिमेंतर्गत मेधा ग्रुपला रेल्वे निर्मितीच्या प्रकल्पाचे कंत्राट भारतीय रेल्वेकडून मिळाले आहे. याअंतर्गत मेधा ग्रुप 44 रेल्वेंच्या डब्यांची बांधणी करणार असल्याचे सांगण्यात येते. हैदराबादची कंपनी मेधा सर्व्हो ड्राइव्हस सदरच्या कंत्राटाअंतर्गत येणाऱया काळात वंदे भारतअंतर्गतच्या 44 रेल्वेंची बांधणी करणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत हे काम केले जाणार असून 2 हजार 111 कोटींचे हे कंत्राट असेल. यात देखभालीचा काही भाग सोपवला जाणार असल्याचे समजते. या कंत्राटामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेलाही बळ मिळू शकणार आहे. चेन्नई, कपुरतला आणि रायबरेली येथील रेल्वे डब्यांची बांधणी केली जाणार आहे.