ऑनलाईन टीम / मेलबर्न :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 26 ऑक्टोबपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
मेलबर्नमध्ये शनिवारी लॉकडाऊन विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यात एक पोलीस जखमी झाला असून, पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी न झाल्यास मेलबर्नवासीयांना आणखी किमान सात आठवड्यांच्या लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. ऑस्ट्रेलियातील मोठे शहर असलेल्या व्हिक्टोरियाचे मुख्यमंत्री डॅनियमल अँड्र्यूज यांनी राज्य पुन्हा सुरळीत होण्यासाठी चार टप्प्यांची योजना आखली आहे.13 सप्टेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू राहणार आहे. रात्री 9 ते सकाळी 5 कुणाला बाहेर पडता येणार नाही. 28 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत.