नवी दिल्ली
मोबाईल क्षेत्रातील कंपनी मोटोरोला येत्या काळात आपला नवा स्मार्ट टीव्ही बाजारात दाखल करणार आहे. यासोबत नवा टॅब्लेटही सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. कंपनी भारतात टॅब्लेट बाजारात प्रथमच उतरत असून मोटो टॅब 8 हा नवा टॅब्लेट सादर करणार असून स्मार्ट टीव्हीच्या बाजारातही नवा टीव्ही लाँच करत आगमन करणार आहे. सदरचे दोन्ही नव्या उत्पादनांचे लाँचिंग 1 ऑक्टोबरला होण्याची शक्मयता सांगितली जात आहे.