ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 18) विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या सदस्यांसोबत नुकत्याच झालेल्या विचारमंथन शिबिरानंतर पंतप्रधानांनी आढावा बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ही बैठक होईल.
या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही कोरोनामुळे माणसाच्या जीवनमानात झालेले बदल आणि आव्हाने, तसेच अर्थव्यवस्थेतील तेजी आणि कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीती लक्षात घेता त्यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.