प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांनी मोरजी येथे रशियन नागरिकाकडून 4.89 लाख रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त केला. पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मधलावाडा मोरजी येथे भाडय़ाच्या खोलीत राहत असलेला मूळ रशियन नागरिक रिबरिव्ह अलेक्सी (वय 45) हा अमलीप्रदार्थ व्यवहारात असल्याची माहिती पेडणे पोलिसांना खास सूत्रांकडून मिळाली होती.
पेडणे पोलिसांनी निरीक्षक जिवबा दळवी यांनी टिम तयार केली यात उपनिरीक्षक संजित कांदोळकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर , उपनिरीक्षक हरिश वायंगणकर , हेड कॉन्स्टेबल, प्रविण महाले, स्वप्नील शिरोडकर, विष्णू गाड, व संदेश वरक यांनी धाड टाकली. या धाडीत हशिष तेल 465 ग्रॅम रुपये 4 लाख, 65000 आणि कॅनबिस बिया 240 ग्रॅम रुपये 24,000 मिळून रु 4.89 लाख किंमतीचे अमली प्रदार्थ जप्त करुन संशयीतावर अमली प्रदार्थ कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करुन रिबरिव्ह अलेक्सीयांना अटक केली.
पेडणे पोलीस स्थानकाचे उपअधिक्षक समिल शेख , उत्तर गोवा अधिक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुढील तपास करीत आहे.