प्रतिनिधी /बेळगाव
परदेशी शिक्षण आणि भाषा याबाबतीत मार्गदर्शन करणाऱ्या एका मान्यताप्राप्त संस्थेची आम्ही बेळगावात फ्रॅंचाईजी घेतली असून मोरे ओवरसीज स्टडीज या नावाने आमची संस्था कार्यरत आहे त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बेळगावात ही संधी उपलब्ध झाली आहे अशी माहिती या संस्थेचे संचालक श्री.संजय मोरे यांनी दिली.
लिव्ही ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड या गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना माहिती पुरवीत असलेल्या संस्थेचे उरण नवी मुंबई महाराष्ट्र येथे कार्यालय आहे. गेल्या 11 वर्षापासून ही संस्था या क्षेत्रात कार्य करीत आहे. वैद्यकीय ,इंजीनियरिंग,केटरिंग व मॅनेजमेंट अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेला आय एस ओ 9001 : 2015 नामांकन मिळाले असून संस्था सरकारी मान्यताप्राप्त आहे . संस्थेच्या फ्रॅंचाईजी देशभर देत असून बेळगावात श्री संजय मोरे ,चेअरमन मर्कंटाईल को ऑपरेटिव सोसायटी यांची नेमणूक केली आहे.
परदेशातून एमबीबीएस करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. जगभरातल्या उच्चश्रेणीच्या विद्यापीठातून शंभर टक्के प्रवेश देण्याची आम्ही हमी देतो, कमीत कमी ट्युशन फी, भारतीय पद्धतीच्या जेवणाचं व राहण्याची व्यवस्था, एम सी सी आय व डब्ल्यू एच ओ मान्यताप्राप्त असून प्रवेश परीक्षा नाही याबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट युरोप, आशिया, यु एस ,यु के, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या ठिकाणी करण्याची सोय आहे दहावी बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आपले करिअर करण्याची संधी आहे इच्छुकांनी श्री संजय मोरे यांना 98 459 60 330 या क्रमांकावर संपर्क साधावा.