बेळगाव : साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित सातव्या साईराज चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी ग्रामीण वॉरियर्स, मोहन मोरे इलेव्हन, मोईन बॉईज, संघानी पुढील फेरीत प्रवेश केला.
व्हॅक्सिनडेपो मैदानावर पहिल्या सामन्यात ग्रामीण वॉरियर संघाने 8 षटकात 5 बाद 98 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्टार इलेव्हनचा डाव 8 षटकात सर्वबाद 34 धावात आटोपला. दुसऱया सामन्यात बोरबोंडे क्लब चंदगड संघाने 8 षटकात 8 बाद 54 धावा केल्या. रॉ स्पोर्ट्स क्लबने 5 षटकात 3 बाद 55 धावांसह सामना 7 गडय़ानी जिंकला. तिसऱया सामन्यात फ्रेंन्ड्स संघाने 8 षटकात 4 बाद 46 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मोहन मोरे संघाने 5 षटकात 5 बाद 51 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला.
चौथ्या सामन्यात मोईन बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 7.3 षटकात 6 बाद 101 धावा केल्या. बालाजी स्पोर्ट्सने 7.3 षटकात 6 बाद 63 धावा केल्या. पाचव्या सामन्यात मोहन मोरे संघाने 8 षटकात 6 बाद 71 धावा केल्या. त्याला उत्तर देताना रॉ स्पोर्ट्स एसपीएम रोड संघाला 8 षटकात 4 बाद 61 धावा करता आल्या.