पाच महिन्यात 40 टक्क्मयांपेक्षा अधिक रिटर्न
वृत्तसंस्था/ मुंबई
मार्च महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंतच्या एकूण पाच महिन्यांच्या कालावधीत म्युच्युअल फंडच्या मिडकॅप फंड्सनी समाधानकारक परतावा दिला आहे. या फंडच्या योजेनेमधून 40 ते 55 टक्क्मयांपर्यत परतावा गुंतवणूकदारांना मिळालेला आहे.
या कामगिरीमध्ये मीडियम फंड हाऊसमधील इनवेस्को म्युच्युअल फंड सर्वोच्च स्थानी राहिला असून मोठय़ा फंड हाऊसमध्ये आयसीआयसीआय म्युच्युअल फंडची योजना अक्वल स्थानावर राहिली आहे. आगामी काळात सदरचा परतावा तेजीत राहणार असल्याचा अंदाज मांडलेला आहे.
जवळपास मार्च महिन्यांच्या 23 तारखेनंतर ज्या फंड हाऊसनी परतावा दिला आहे. त्यामध्ये मध्यम कॅपच्या योजनांनी सर्वाधिक परतावा दिलेला आहे. यामध्ये इनवेस्को इंडियाचा मिड कॅपने तर 45.60 टक्क्यांचा लाभ दिला आहे. बीएनपी पारिबाने 42.89, फ्रँकलिन इंडिया प्राईम फंड 43.52, कोटक इमर्जिंग इक्विटी फंडने 45.47 आणि सुंदरम मिड कॅप फंडने 42.79 टक्के इतका परतावा दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय अव्वल
सर्वात मोठय़ा फंड हाऊसमध्ये आयसीआयसीआय प्रुडेंशियल मिड कॅप फंडने 55 टक्के, एचडीएफसी मिड कॅप अर्पोच्युनिटीज फंड 50.35, ऍक्सिस मिडकॅप 38.91, स्टेट बँक मॅग्नम मिड कॅप 49.75, आदित्य बिर्ला सन लाईफ मिड कॅपने 43 टक्के परतावा दिला आहे.