ऑनलाईन टीम / कॅनबेरा :
देशातील मूळनिवासींच्या सन्मानासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलला आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ही माहिती दिली.
ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर नावाच्या राष्ट्रगीताची दुसरी ओळ ‘फॉर वुई आर यंग अँड फ्री’ अशी आहे. या ओळीतील ‘यंग’ या शब्दाऐवजी ‘वन’ हा शब्द टाकण्यात आला आहे. राष्ट्रगीतातील हा बदल म्हणजे एकजुटीची भावना असल्याचे मॉरिसन यांनी म्हटले आहे.
‘फॉर वुई आर वन अँड फ्री’ म्हणजेच आम्ही एक आणि स्वतंत्र आहोत, अशा आशयाची ही ओळ आहे.