प्रतिनिधी/ म्हसवड
म्हसवड येथे नव्याने सुरु होते असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी सेंटरमध्ये कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरला सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट देऊन विविध अडचणीची माहीती घेऊन सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेशमा शेंडगे, मुख्याधिकारी चेतना केरूरे, सपोनि गणेश वाघमोडे, तलाठी उत्तम आखडमल, सागर सरतापे आदी उपस्थीत होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा जिह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढु लागल्याने प्रशासनाने अधिक सतर्क होत आहे. अनेक गावामध्ये रुग्ण आढळुन आल्याने तो परिसर कंटेन्टमेंट झोन निर्माण केले आहेत, तर म्हसवड शहरात विलिगीकरण कक्ष उभारला आहे. सध्या येथील विलिगीकरण कक्षात कोरोना बाधित चे 4 रुग्ण दाखल झाले असून हे रुग्ण ज्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहेत, त्याच्या शेजारील इमारतीमध्ये संशयीत रुग्ण स्वतंत्रपणे ठेवले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी सिंग यांनी म्हसवड पालिकेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे यांच्याकडे शहरात कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिकेने काय उपाययोजना राबवत आहेत याची विचारणा केली. मुख्याधिकारी केरुरे म्हणाल्या, शहरात यापुर्वी निर्जंतुकीकरणाची फवारणी केली असून शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लवकरच पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरवासीयांचे शारीरिक तापमान तज्ञांच्या मार्फत तपासले जाणार असून त्यासोबत प्रत्येक कुटुंबाला होमिपँथीक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. सध्या संपूर्ण शहरात पुन्हा एकदा निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याचे काम सुरु आहे. तर शहरात नव्याने येणाऱया प्रत्येकाची नोंद पालिकेच्यावतीने केली जात असून नव्याने शहरात आलेल्या व्यक्तींच्या घरी पालिकेचे कर्मचारी दररोज जावून त्यांच्याकडे आजाराबाबत चौकशी करीत आहेत.
.