म्हापशात भाजप संस्थापक दिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा शहर हे उत्तर गोव्यातील राजधानी आहे. म्हापशाबद्दल लोकांचा जो विश्वास आहे तो 2022 च्या निवडणुकीत म्हापसा वासियांनी दाखवून दिला आहे. आणि तो विश्वास भाजप पक्ष राहिलेल्या तीन मंत्र्यांपैकी म्हापशात दाखवून देणार आहे. अशी माहिती म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत दिली.
उत्तर गोवा भाजपा कार्यालयाच्याबाहेर भाजपचा रितसर बावटा फडकावल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. म्हापशाला मंत्री मंडळात सामावून घेणार अशई म्हापसा वासियांची मागणी होती ती अद्याप का पूर्ण झाली नाही असा प्रश्न जोशुआना केल्यावर ते म्हणाले की, म्हापसा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे माहीत आहे. सदैव भाजप सरकार असताना म्हापशात भाजपचा मंत्री असायचा व आपल्यास पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री म्हापशावर अन्याय करणार नाहीत. भाजप सिंगल मोठा पक्ष आहे. या पक्षात आज 11 कोटी कार्यकर्ते आहेत. राज्यात केंद्रात भाजप सत्तेवर आहे. या पक्षात अनेकांनी कित्येक वर्षे कार्य केले आहे. गेली 15 वर्षे भाजप म्हापसा राज्य चालवित आहे हे भाजपचे कुटुंब मोठय़ा प्रमाणात वाढत चालले आहे. म्हापशात कार्यकर्ते सदैव भाजप निवडून आणत आहे. 2019 साली नंतर आता 2022 साली पुन्हा विधान सभेत भाजपला स्थ दिली आहे. म्हापशाचे सदैव प्रतिनिधीत्व लागले आहे व म्हापशाला योग्य न्याय मिळणार आहे अशी माहिती आमदार जोशुआ यांनी दिली.
भाजप आज घरोघरी पोचला- नगराध्यक्ष वायंगणकर
नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, आज भाजप संस्थापक दिन या निमित्त ध्वज फडकावण्यात आला आहे. 11 सदस्यांची 1980 साली स्थापना झाली. जनसंघ म्हणून पक्षाचे नाव होते ते नंतर भाजप म्हणून नावारुपास आले. भाजपचा अखंड कार्यकर्ता आहे. 11 सदस्यांचे आज 11 कोटी सदस्य झाले. जगात भाजपचा कार्यकर्ता रुजलेला आहे. या दिनी सर्वांना शुभेच्छा असे त्या म्हणाल्या.
आणिबाणी नंतर भाजप नावारुपास आला- हनुमंत वारंग
हनुमंत वारंग म्हणाले की, आज भाजप स्थापना दिवस. 1951 साली आम्ही जनसंघ म्हणून काम करीत होतो. आज जे काम जनसंघावेळी केले त्यांना बळ मिळाले. आणिबाणी लागले तेव्हा जनता संघ म्हणून सुरारजी देसाई पंतप्रधान होते. 1980 साली 11 जणांनी संघ हिंदुत्व वलिचारांनी भाजपची स्थापना झाली. त्यानंतर हा पक्ष पुढे जात वर गेला व आज भाजप उच्च पदावर पोहोचला असे ते म्हणाले.