२० लाखाचा मद्यसाठ्यासह २८ लाखाचा ऐवज जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कर्नाटक सीमेवर म्हैशाळ ते कागवाड रस्त्यावर तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक पकडून २१ लाखाचा मद्यसाठा व ट्रक असा २८ लाखाचा ऐवज जप्त केला.
शनिवारी संध्याकाळी म्हैसाळ येथे तपासणी नाक्यावर जीजे. १५ एव्ही १२४४ या मालवाहतुक ट्रक मधून गोवा राज्यातून बेकायदा आणलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे २६९ बॉक्स, ६०० प्लॅस्टिक कॅन व ट्रक जप्त करण्यात आला. यावेळी ट्रकचालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. ट्रकमधील २० लाख ९० हजार किमतीचा दारु साठा व ७ लाखाचे वाहन असा २७ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यांत आला.
ट्रकमध्ये इम्पेरियल ब्ल्यु व्हिस्कीचे १५१ बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्कीचे २९ बॉक्स, रोकफोर्ड व्हिस्कीचे ५ बॉक्स, ब्लेंडर प्राइड व्हिस्कीचे १७ बॉक्स,किंगफिशर बियर टिनचे ४६ बॉक्स , हॅनकिंन बियर टिनचे ५ बॉक्स, रॉयल स्टॅग व्हिस्कीचे १२ बॉक्स अशी गोवा बनावटीची दारु जप्त करण्यांत आली. याबाबत फरार वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अभिनंदन कांबळे अमृता पाटील युवराज कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.