म्हैसूर/प्रतिनिधी
म्हैसूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी म्हैसूरमध्ये कोविड -१९ रूग्णांना बेड आणि वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत नसल्याचे म्हंटले आहे. के.आर. रुग्णालयाला दिलेल्या अचानक दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी, म्हैसूरमध्ये कोविड प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तरीही कोरोना नियंत्रणात आहेत. हा प्रसार नियंत्रित करण्यासाठी नवीन नियमावली लागू करायची की नाही याबाबतचा निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
मंत्र्यांसमवेत म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा, उपायुक्त रोहिणी सिंधुरी, मुडाचे अध्यक्ष एच.व्ही. राजीव, एमएमसीआरआय डीन आणि संचालक सी.पी. नानराज आणि इतर यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री सोमशेखर यांनी के.आर. रुग्णालय येथे उभारलेल्या १३ के.एल. वैद्यकीय ऑक्सिजन टाकीचीही पाहणी केली.
उपायुक्तांनी मंत्र्यांना सांगितले की, म्हैसूरांना दररोज १२ के.एल. ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि आतापर्यंत ऑक्सिजनची कमतरता नाही. सध्याच्या १३ के.एल. लिक्विड ऑक्सिजन पुरवठा क्षमता असलेला टँक के. आर. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या गरजा भागवेल. रुग्णालय, डॉक्टरांनी मंत्री सोमशेखर यांना सांगितले.