प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील प्रमुख मंदिरे बंद आहेत. गेल्या वषीही केवळ 15 ते 20 दिवस देवदर्शनासाठी मंदिरे खुली होती. त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा देवदर्शन बंद झाले आहे. त्यामुळे सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानतर्फे जिल्हय़ातील पुजाऱयांसाठी 600 किटचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशावरून यल्लम्मा देवस्थानतर्फे बेळगाव तालुक्मयासाठी 150, बैलहोंगल तालुक्मयासाठी 150, गोकाक तालुक्मयासाठी 100, सौंदत्ती तालुक्मयासाठी 100, मुडलगीसाठी 50 व कित्तूरसाठी 50 असे 600 अन्नधान्याचे किट रविवारी वितरणासाठी रवाना झाले.
अनेक देवस्थानातील पुजारी अडचणीत आहेत. ग्रुप-सी देवस्थानातील पुजाऱयांसाठी या किटचे वितरण करण्यात येणार आहे. सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानचे सीईओ रवी कोटारगस्ती यांनी रविवारी ही माहिती दिली आहे.