वार्ताहर/ कास
सातारा कास रोड वरील यवतेश्वर घाटात वारंवार बिबटयाचा वावर असल्याच दिसुन येते मात्र नुकताच घाटातील भिंतीवर दबा धरून बसलेल्या दोन बिबटय़ाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने स्थानिकांसह प्रवासी पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र तरुण भारत प्रतिनिधीनी सातारा वनक्षेत्रापाल निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधुन माहीती घेतली असता ते म्हणाले व्हायरल व्हिडीओनुसार आम्ही सकाळीच टिम सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता तेथे कोठेच बिबटय़ाच्या हलचाली पाऊल खुणा किंवा ते ठिकाण आढळुन आले नाही त्यामुळे हा व्हायरल व्हिडीओ जुनाच असेल किंवा ईतर ठिकाणंच असुन व्हायरल होणारांकडुन माहीती घेतली असता प्रत्येक जण आम्ही नाही त्यांनी केलाय त्यामुळे प्रत्यक्षात कोणीही पुढे येत नसुन स्थानिकांशी संवाद साधताना नागरीकांनी घाबरून जाऊ नये असे अवाहन त्यांनी केले आहे
सातारा हा निसर्गसंपदेने नटलेला परिसर असुन येथे बिबटय़ासह अन्य प्राण्यांचा आधिवास आहे ते त्यांच्या आधिवासात भ्रमंती करत असतात मात्र बिबटया कोणाला दिसल्यास त्यांनी घाबरून जाऊ नये कोणी व्हिडीओ फोटो काढल्यास वनविभागाशी त्वरीत संपर्क साधावा जेणेकरून खरी माहीती मिळून वनविभागाला ऊपाययोजना करता येथील मात्र खत्री न झालेले आपल्याकडील व्हिडीओ व्हायरल करून जनतेला घाबरून सोडु नये अलिकडे सोशल मिडीयावर कोणीही जुने कुठलेही व्हिडीओ कोणत्याही ठिकाणाचे नाव देऊन व्हायरल करत आहेत त्यामुळे नागरीकांनी त्याची सत्यता पटल्या शिवाय घाबरून जावु नये बिबटय़ा हा घाबरणारा मवाळ प्राणी असुन शक्यतो तो माणसावर हल्ला करत नाही त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता वनविभागाशी संपर्क साधावा असे अवाहन वनविभागाने केले आहे