जिल्हय़ातील मंदिरे खुली केल्याने महसुलात वाढ होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे परिवहनच्या अधिक उत्पन्नावर परिणाम झाला होता. मात्र आता जिल्हय़ातील मंदिरे खुली करण्यात आल्याने यात्रेसाठी परिवहनच्या जादा बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत. या माध्यमातून परिवहनच्या महसुलात देखील वाढ होणार आहे. गतवषी यात्रा, उत्सवातून परिवहनला 27 लाख 70 हजार रुपये इतका महसूल जमा झाला होता. यंदा कोरोनामुळे मंदिरे भक्तांसाठी बंद ठेवल्याने महसुलावर परिणाम झाला आहे.
शासनाने आता मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले केल्याने दर्शनासाठी भक्तांचा ओघ वाढला आहे. मंदिरांना भेट देणाऱया भक्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त सोडण्यात येणाऱया जादा बसेसची संख्या पूर्ववत होणार आहे. त्यामुळे परिवहनचा महसूल वाढणार आहे. सौंदती तालुक्मयातील यल्लम्मा यात्रा, भटकळ तालुक्मयातील उळवी व हुक्केरी तालुक्मयातील दड्डी (मोहनगा) यात्रेसाठी जाणाऱया भक्तांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. दरम्यान परिवहनकडून भक्तांच्या सोयीखातर जादा बस पुरविली जाते. तसेच रायबाग तालुक्मयातील चिंचली, खानापूर तालुक्मयातील माऊली, मलप्रभा नदीवर यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे भक्तांची संख्या वाढली आहे. या मार्गावर ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रवाशांच्या संख्येनुसार जादा बस सोडल्या जात आहेत.
उळवी, यल्लम्मा, मोहनगा दड्डी, मलप्रभा खानापूर या यात्रांतून गतवषी परिवहनला 27 लाख 70 हजार रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदादेखील काही यात्रांना प्रारंभ झाला असून काही यात्रांना येत्या दिवसात सुरुवात होणार आहे. त्यामुळे परिवहनने देखील जादा बसेसची व्यवस्था केली आहे. शिवाय दरवषी गावपातळीवर यात्रा व महालक्ष्मीचे आयोजन केले जाते. दरम्यान. जादा बसमधून परिवहनला उत्पन्न मिळत असते. त्यामुळे परिवहनचे महसूल पूर्ववत होणार आहे.