नवी दिल्ली
स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड आज (22 जुलै) सादर केला जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. या स्मार्टफोनबाबत विविध माहिती समोर आली आहे. वनप्लस नॉर्डच्या जागेवर नवीन नॉर्ड 2 मध्ये कंपनी फ्लॅगशिप वनप्लस 9 आवृत्तीच्या डिझाईनची झलक पहावयास मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 5-जी सपोर्ट करणारा राहणार असल्याची माहिती आहे. यात स्मार्टफोनला 6.43 इंचाचा पंच होल ऍमोलेड डिस्प्ले मिळण्याचे संकेत आहेत. तसेच पूर्ण एचडी रिझोल्यूशनची सुविधा मिळणार आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत दोन लेन्स व्हर्टिकली, तिसरी लेंस आणि एलइडी फ्लॅश हॉरिझॉन्टली मिळणार आहे.