कीव्हवर रशियाच्या रॉकेट हल्ल्यामुळे गमावला जीव
युक्रेनची विख्यात अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा कीव्हमध्ये एका नागरी इमारतीवर रशियाकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे. यंग थिएटरने यासंबंधी माहिती दिली आहे. ओक्साना या 67 वर्षांच्या होत्या.
श्वेत्स यांनी अनेक दशकांपर्यंत रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना युक्रेनच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याचे अनुवादित नाव ‘युक्रेनचा सन्मानित कलाकार’ असे आहे. हा पुरस्कार केवळ देशातील सर्वात कुशल कलाकाराला देण्यात येतो.
यंग थिएटरने श्वेत्स यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. श्वेत्स यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1955 रोजी झाला होता. त्यांनी इवान प्रेंको थिएटर आणि कीव्ह स्टेट इन्स्टीटय़ूट ऑफ थिएटर आर्ट्समध्ये थिएटर स्टुडिओमधून पदवी मिळविली होती. यंग थिएटरसोबत श्वेत्स यांनी टेरनोपिल म्युझिक अँड ड्रामा थिएटर आणि कीव्ह थिएटरमध्ये काम केले हेते.
रशियाच्या गोळीबारात जखमी झालेल्या युक्रेनच्या एका बॅले डान्सरने अखेरचा श्वास घेतला आहे. मृत्युमुखी पडलेल्या बॅले डान्सरचे नाव अरटायम दाशिशिन होते आणि ते 43 वर्षांचे होते. दाशिशिन युक्रेनच्या प्रमुख डान्सर्सपैकी एक होते.