कीव्ह शहराची केली पाहणी ः अध्यक्ष झेलेंस्कीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा
रशियाकडून युक्रेनवर अद्याप मोठय़ा तीव्रतेचे हल्ले सुरूच आहेत. याचदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यासोबत एकजूटता दर्शविण्यासाठी युक्रेनचा दौरा केला आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान शनिवारच्या बैठकीत ब्रिटनकडून युक्रेनला देण्यात येणाऱया दीर्घकालीन समर्थनासह वित्तीय आणि सैन्य सहाय्यासाठी नव्या पॅकेजवर चर्चा झाल्याचे ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
युक्रेनला उच्चक्षमता युक्त सैन्य उपकरणे खरेदी करण्यासाठी आणखीन 10 कोटी पाउंड देण्याच्या घोषणेच्या दुसऱया दिवशी जॉन्सन यांनी हा दौरा केला आहे. रशियाकडून सातत्याने होणाऱया हल्ल्यांदरम्यान ब्रिटन युक्रेनला मदत करू इच्छितो, जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करू शकेल असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे उपप्रमुख एंड्रिज सिबिहा यांनी दोन्ही नेत्यांची कीव्हमध्ये भेट झाल्याचे सांगितले आहे.
ब्रिटन आणि जर्मनीने युक्रेनच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यावर सहमती दर्शविली आहे. रशियाच्या हल्ल्यांसह पुतीन यांचा डाव हाणून पाडण्यासाठी जी-7 भागीदारांसोबत काम करणार आहोत असे जॉन्सन यांनी ट्विट करत सांगितले आहे.
युक्रेनला सैन्य मदत
युक्रेनच्या सैन्याला विमानविरोधी क्षेपणास्त्र आणि अन्य 800 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रs देण्याची घोषणा जॉन्सन यांनी केली आहे. याचबरोबर अधिक शिरस्त्राणे (हेल्मेट), नाइट व्हिजनयुक्त उपकरणे तसेच शस्त्रास्त्रs पुरविण्याचे आश्वासन त्यांनी युक्रेनला दिले आहे. ब्रिटनकडून दोन लाख सैन्य उपकरणांची खेप पूर्वीच युक्रेनमध्ये पोहोचली आहे.
इटलीचा कीव्हमध्ये दूतावास
ईस्टरनंर इटली कीव्हमध्ये पुन्हा स्वतःचा दूतावास सुरू करणार असल्याची माहिती इटलीचे विदेशमंत्री लुइगी डि माओ यांनी दिली आहे. कीव्हमध्ये सर्वप्रथम परतणाऱया देशांमध्ये इटलीचा समावेश असणार आहे. युक्रेनला उघड समर्थनाची ही एक कूटनीतिक पद्धत असल्याचे मानले जातेय.