झापोरिझियातील घटनेत 12 ठार, 45 जखमी
किव्ह / वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनच्या झापोरिझिया येथे पुन्हा एकदा जोरदार क्षेपणास्त्रहल्ला चढवला. रशियाने रविवारी पहाटे साडेचार वाजता झापोरिझिया येथे 10 क्षेपणास्त्रे डागली. निवासी भागात झालेल्या या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा मुलांचाही समावेश असल्याची माहिती झापोरिझियाचे लष्करी प्रमुख अलेक्झांडर स्टारुख यांनी दिली आहे. हल्ला झाला त्यावेळी लोक झोपले होते. याचदरम्यान पहाटेच्या सुमारास अचानक त्यांच्या घरांवर क्षेपणास्त्रे आदळली. या हल्ल्यात एका अपार्टमेंटसह पाच इमारतींचे नुकसान झाले. 24 गाडय़ाही आगीत भस्मसात झाल्या असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. झापोरिझिया हे युरोपातील सर्वात मोठय़ा अणु प्रकल्पापासून 125 किमी अंतरावर आहे. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने ते ताब्यात घेतले होते.
रशियाला क्रिमियाशी जोडणारा केर्च रेल्वेपूल शनिवारी स्फोटात उद्ध्वस्त झाला. यानंतर रशियाने तेथील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पूल कोसळल्यानंतर काही तासांतच रशियाने युपेनमधील झापोरिझियावर हल्ला केला. रशियाने युपेनमधील झापोरिझिया येथे राहणाऱया नागरिकांवर दुसऱयांदा क्षेपणास्त्रे डागली आहेत. यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी रशियाने युपेनमधील झापोरिझिया येथे स्थानिक लोकांच्या मदतीसाठी जाणाऱया ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला होता.