शिकागो
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अन्नधान्याच्या किंमतीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. फ्रान्ससह अमेरिकेला त्याची झळ बसते आहे. गव्हाची निर्यात करणारा रशिया हा जगातला आघाडीवरचा देश आहे. शिकागोमध्ये अन्नधान्याच्या किंमतीमध्ये 40 टक्के इतकी वाढ गेल्या काही दिवसात दिसून आली आहे. रशियाने युपेनमध्ये युद्धामार्फत आक्रमण केल्याने अन्नधान्याच्या पुरवठा साखळीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. जागतिक पातळीवरील अन्नधान्य पुरवठय़ात अडचणी येत आहेत. सध्याच्या किमती या 14 वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. इतर देशात फ्रान्समधील पॅरिसमध्ये गव्हाचे पीठ महाग झाले आहे. युद्धाच्या कारणास्तव युपेनमधील प्रमुख बंदरे बंद करण्यात आली असून लॉजिस्टिक्स आणि वाहतुकीसंदर्भातली साखळी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे व्यापार प्रतिबंधाचा फटका चांगलाच बसतो आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. युद्धानंतर पुरवठय़ाची साखळी मात्र चांगलीच प्रभावीत झाली आहे. त्यामुळेच गहू, पीठ वगैरे महाग झाले आहे. दरम्यान युक्रेन अन्नधान्य निर्यात करण्याच्या सध्या तरी मनःस्थितीत नाही.