म्हाळू कोरे यांचे मत : बेडकिहाळात यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
वार्ताहर/ बेडकिहाळ
धनगर समाजाला मोठा इतिहास व परंपरा आहे. पण, हा समाज सामाजिक, राजकीय व विशेष करून शैक्षणिक क्षेत्रापासून वंचित राहिला आहे. मेंढपाळ व्यवसाय असल्याने भटकंती करत ऊन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पोटाची खळगी भरण्यासाठी समाज प्रयत्नशील असतो. यामुळे पूर्वी समाजातील मुला-मुलींना शिक्षण घेता येत नव्हते. पण, सध्या ती परिस्थिती राहिलेली नाही. आज सर्व सुविधा मिळत आहेत, तेंव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत कर्नाटक धनगर समाज चिकोडी तालुका सचिव म्हाळू कोरे यांनी व्यक्त केले.
बेडकिहाळ येथील विठ्ठल-बिरदेव मंदिरात 11 रोजी खडकलाट येथील संजय गावडे यांची उपनिरीक्षकपदी तर बेडकिहाळ येथील प्रमोद शिवाजी पाटील याने लोकसेवा आयोगातून यश संपादन केले आहे. यानिमित्त आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. सदस्य प्रमोदकुमार पाटील, माजी उपाध्यक्ष विनोद वरुटे, निवृत्त शिक्षक शिवाजी पाटील, पीकेपीएसचे मुख्य व्यवस्थापक अजित धनापागोळ, बाळू कोरे उपस्थित होते.
यावेळी प्रमोदकुमार पाटील, शिवाजी पाटील, प्रमोद पाटील, पत्रकार कृष्णा आरगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तिप्पण्णा कोरे, राघू कोरे, मल्लप्पा कोरे, बाबुराव बत्ते, बाबू खरात, अनिल देशपांडे, दत्ता निपाणे, नवलाप्पा कोरे, आप्पाजी कोरे, प्रकाश कोरे, सतीश कोरे, सागर कोरे, महेश बत्ते, ओंकार बत्ते, मंजुनाथ कोरे, बिरा कोरे, कार्याप्पा कोरे, महादेव कोरे उपस्थित होते.