प्रतिनिधी/ सातारा
फोनवर बोलत चाललेल्या युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱया दोन चोरटय़ांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यामध्ये अक्षय सुर्यकांत पवार (वय 23, रा. मस्करवाडी, ता. सातारा) व एक अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून गुह्यातील ऐवज हस्तगत केला आहे.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 जानेवारी रोजी एक युवती देगाव फाटा येथून फोनवर बोलत चालली होती. त्याच वेळी दुचाकीवरुन दोन युवक आले अन् त्या युवतीला काही कळायच्या आतमध्ये तिच्या हातातील मोबाईल घेऊन ते दोन युवक पळून गेले. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहपोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांनी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम यांना त्यांनी मार्गदर्शन करुन पथकाने शोध सुरु केला. तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतले असता मोबाईल हा मित्राकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. त्याच्या मित्रास ताब्यात घेतले. तेव्हा तो सराईत चोरटा असल्याचे समोर आले. त्याच्यावर यापूर्वी सातारा शहर, वाई या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या गुह्यात चोरीस गेलेला मोबाईल विकत घेणाऱया युवकास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. गुह्यात वापरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल जाधव या करत आहेत. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पो. कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केली.