वृत्तसंस्था/ हिस्सार
गेल्यावर्षी इन्स्टाग्रामवरील मुलाखतीत भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने आपल्या यजुवेंद्र चहल संदर्भात जातीवाचक टिपणी केल्याने हरियाणा पोलीस खात्यातर्फे युवराज सिंग विरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
इन्स्टाग्रामवर रोहित शर्मासमवेत झालेल्या चर्चेच्या सत्रामध्ये यजुवेंद्र चहल संदर्भात युवराज सिंगने नकळत जातीवाचक टिपणी केल्याचे सांगितले. दरम्यान 39 वर्षीय युवराज सिंगने या घटनेबद्दल माफी देखील मागितली आहे. जनतेतील दलित समाजाच्या भावना युवराज सिंगच्या या टिपणीमुळे दुखावल्याचा आरोप ठेवून पोलीस आयुक्त निकिता गेहलोत यांनी या प्रकरणी रजत कलसन या वकिलानी हन्सी पोलीस स्थानकामध्ये युवराज सिंगविरूद्ध अधिकृत एफआयआर नोंदविल्याचे सांगितले.