वृत्तसंस्था/ टय़ुरिन
सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात युवेंटसने युडेनेचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. युवेंटस संघाकडून खेळताना पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोने दोन गोल नोंदविले.
या सामन्यात 31 व्या मिनिटाला रॅमसेच्या पासवर रोनाल्डोने युवेंटसचे खाते उघडले. उत्तरार्धातील खेळाच्या चौथ्या मिनिटाला फेड्रीको चिसाने युवेंटसचा दुसरा गोल नोंदविला. रोनाल्डोने युवेंटसचा तिसरा तर डिबेलाने युवेंटसचा चौथा गोल नोंदविला. युडेनेसीतर्फे एकमेव गोल झिगलेरने केला. 2020-21 च्या सिरी ए फुटबॉल हंगामात रोनाल्डोने 14 गोल नोंदविले आहेत. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात युवेंटसने पाचवे स्थान मिळविले आहे. एसी मिलान पहिल्या स्थानावर आहे.