सीईएन विभागाची कारवाई
यूट्यूबवर लहान मुलांसंबंधी आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणार्या रामदुर्ग तालुक्यातील एका युवकाला जिल्हा गुन्हे तपास विभागाच्या (सीईएन) अधिकार्यांनी सोमवारी अटक केली आहे.
चंद्रु दुर्गापा बंडीवड्डर (वय 45, रा. भाग्यनगर, रामदुर्ग) असे त्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आयएमईसी विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्यावर माहितीतंत्रज्ञान कायदा 67 (ए), 67(बी) कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आले होते.
सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक विरेश दोड्डमनी व त्यांच्या सहकार्यांनी सोमवारी चंद्रुला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाकडून तरी आलेला लहान मुलासंबंधीचा आfश्लल व्हिडीओ या युवकाने सोशल मीडीयावर पोस्ट केला होता. आयएमईसीच्या पाहणीत हि गोष्ट आढळून आली. त्यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.