बेळगाव : मानस स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित युनियन जिमखानातील टर्फ फुटबॉल मैदानावर एमएसडीएफ चषक 12 वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन निलेश देसाई यांच्या हस्ते चेंडूला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
याप्रसंगी संयोजक मानस नायक यांनी स्वागत केले. यावेळी खलीक बेपारी, इम्रान बेपारी, स्पर्धा निरीक्षक मारुती माथूर, समर्थ बांदेकर, राहिद मुरूडखान उपस्थित होते. या स्पर्धेत सेंट झेवियर्स, एमव्हीएम, अंजुमन स्कूल, इस्लामिया स्कूल, कनक मेमोरियल स्कूल, गुड शेर्फड स्कूलच्या फुटबॉल संघानी भाग घेतला आहे.