शिरोळ / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा उरूस साजरा न करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे होते. येथील नगर परिषदेच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली . त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला येथील ग्रामदैवत बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे , परंतु कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर चालू वर्षीचा उरूस येत्या सोमवार ते गुरुवार अखेर साजरा केला जाणार होता .
साध्या पद्धतीने मानकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गरीब व धार्मिक विधी करण्यात येणार आहे . मंगळवारपासून शुक्रवार अखेर भेळवाले ,आईस्क्रीम वाले ,परमिट रूम ,बियर बार ,फिरती हॉटेल ,खानावळ ,मटण , दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच आठवड्याचा बुधवारी भरणारा बाजार रद्द करण्यात आला असून भाजी विक्रेते, फळ विक्रते, यांना सायंकाळी चार वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदत देण्यात आली आहे.
चालूवर्षी पानेवाले ,खेळणेवाले ,भेळवाले ,मिठाईवाले यांना बंदी घालण्यात आली आहे . हे या नियमाचा भंग करणाऱ्यावर प्रतिदिनी दोन हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे . कोणतेही करमणुकीचे अथवा शर्यतीचे कार्यक्रमही घेतले जाणार नाहीत . तसेच मंदिराभोवती बॅरिकेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी घरातूनच दर्शन घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल यादव यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस उपनगराध्यक्ष राजेंद्र माने चुडमुंगे , नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख ,शरद मोरे, बापू पंडित काळे, तातोबा पाटील, जनार्दन कांबळे ,योगेश पुजारी, शहाजी गावडे, संदीप चुडमुंगे ,प्रकाश माळी सागर गवळी, बबन पुजारी, अशोक स्वामी, नागेश स्वामी, रावसाहेब माने यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते