निसर्गाची कलाकृती पाहून अनेकदा अवाप् व्हायला होते. येमेनचा ‘ड्रगन ब्लड ट्र याचाच एक नमुना आहे. सकोट्रा बेटसमुहात आढळणाऱया या वृक्षाचे नावच विशेष आहे. हा वृक्ष 650 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि याची उंची 33 ते 39 फूटांपर्यंत असू शकतो. हा वृक्ष सर्व प्रतिकूल हवामानातही तग धरून राहू शकतो. या वृक्षासंबंधी सर्वात पहिला उल्लेख ईस्ट इंडिया कंपनीचे लेफ्टनंट वेलस्टेड यांच्या 1835 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आढळतो.
ग्रेनाइटच्या टेकडय़ा आणि चुनादगडाच्या पठारांवरील ड्रगन्सब्लड जंगलात हे वृक्ष आढळून येतात. हे वृक्ष स्थानिक लोकांच्या गुरांच्या अन्नाचे स्रोत तसेच यांचा औषध म्हणूनही वापर होत असल्याने आर्थिक दृष्टय़ा महत्त्व बाळगून आहेत.
औषध अन् जादूही
या वृक्षाला ड्रगन ब्लड ट्री म्हटले जाते, याच्या खोडाच्या सालीमधून लाल रंगाचा स्त्राव वाहत असल्याने हे नाव मिळाले आहे. या वृक्षाबद्दल अनेक वदंता आहेत. स्थानिक लोक या लाल रंगाच्या स्त्रावावर तापापासून अल्सरवरील उपचरा मानतात. यात जादूई शक्ती असल्याचेही म्हटले जाते. ड्रगनच्या रक्तासोबत याचे नाव जोडले गेल्याने जादूटोण्यातही याचा वापर होतो. आफ्रिकी-अमेरिकन जादून याचा वापर करण्यात येतो. पण यामागे वैज्ञानिक तथ्य नाही हे उघड आहे.
अस्तित्वावर संकट
पण हे वृक्ष आता अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. काही ठिकाणी नव्या वृक्षाांचा आकार बदललेला दिसून येतो. हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या आहे. सोकोट्रा बेटसमूह कोरडा होत चालला आहे. मान्सूनच्या चक्रात बदल झाले आहेत. 2080 पर्यंत सोकोट्रामधील 45 टक्के भाग वास्तव्ययोग्य राहणार नसल्याची भीती आहे.