प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी आली की चिमूकल्यांना वेध लागतात ते किल्ला प्रतिकृतीचे. येळ्ळूरमध्येही पूर्वीपासूनच किल्ला प्रतिकृती बनविल्या जातात. येळ्ळूर येथील विराट गल्लीच्या मुलांनी आकर्षक अशी राजहंसगडाची प्रतिकृती बनविली आहे. किल्ल्याबरोबरच त्यावर विद्युत रोषणाई केल्यामुळे एक वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे.
येळ्ळूरमध्ये विविध गल्ल्यांमध्ये किल्ले बनविले जातात. विराट गल्ली येथील किल्ला मंडळाचे किसन विजय टक्केकर, आदर्श हणमंत टक्केकर, साहील अनंत कुगजी, नंदन शांताराम बेडके व इतर बालचमूंनी हा किल्ला बनविला आहे.