ऑनलाईन टीम / टोकियो :
जपानच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या (एलडीपी) नेतेपदी योशिहिडे सुगा यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून लवकरच ते शपथ घेतील.
सुगा यांना एलडीपीच्या नेतेपदाच्या निवडणुकीत 534 पैकी 377 मते मिळाली. माजी संरक्षणमंत्री शिगेरु इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा हे सुगा यांचे प्रतिस्पर्धी होते. इशिबा यांना 68 तर किशिदा यांना 89 मते मिळाली. संसदेतील एलडीपीचं बहुमत मिळवल्याने सुगा यांची पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
जपानचे विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती आस्वास्थ्यामुळे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी सुगा यांची निवड होत आहे. ते सरकारी सल्लागार आणि प्रवक्ते आहेत.