ऑर्चर्ड रिसॉर्टच्या कार्यक्रमाने होळी सणाला वेगळी मोहोर : नागरिकांनी खमंग शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचा घेतला आस्वाद
प्रतिनिधी / बेळगाव
डीजे व ढोल नगाऱयाच्या तालावर ‘रंग बरसे’ या कार्यक्रमात तरुणाई जल्लोषात थिरकली. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक रंगांची उधळण, त्यावर पाण्याचा फवारा, आनंददायक वातावरण यामुळे ऑर्चर्ड रिसॉर्टच्या कार्यक्रमाने होळी सणाला एक वेगळी मोहोर लावली. या होलिकोत्सवाबरोबरच नागरिकांनी खमंग अशा शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेतला.
होळी व रंगपंचमीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नावगे क्रॉस येथील ऑर्चर्ड रिसॉर्टने शुक्रवारी ‘रंग बरसे’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकीकडे गरमीमुळे अंगाची लाही लाही होत असताना दुसरीकडे सुमधूर संगीतावर पाण्याच्या बारीक फवाऱयावर नाचण्याचा आनंद तरुणाईने घेतला. तरुणाईने बेभान होऊन या गाण्यांवर नृत्य केले. रासायनिक रंगांमुळे त्वचेचे विकार होतात. यासाठी नैसर्गिक रंग नागरिकांना पुरविण्यात आले होते. या रंगांची उधळण करत युवावर्गाने होलिकोत्सव साजरा केला.
ढोल-नगाऱ्याने अनोखे स्वागत
ऑर्चर्ड रिसॉर्टने पहिल्यांदाच ‘रंग बरसे’ हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला उत्तम स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. प्रत्येक नागरिकाचे ढोल-नगाऱयाने स्वागत करण्यात येत होते. ज्याप्रकारे उत्तर भारतात ढोल-नगाऱयाच्या संगीतावर नृत्य केले जाते, त्याचप्रकारे येथेही ढोल वाजविले जात होते. या ढोल-नगाऱयाच्या संगीतावर युवावर्ग बेभान होऊन नाचला.
शॉवरखाली भिजत नागरिकांचे नृत्य
मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे रंगपंचमी साजरी करता आली नव्हती. परंतु यावषी परवानगी मिळाल्यामुळे रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. ऑर्चर्ड रिसॉर्टमध्ये मोजक्मयाच नागरिकांना प्रवेश देण्यात आला. यामुळे प्रत्येकाला आपला आनंद साजरा करता आला. लावण्यात आलेल्या शॉवरखाली भिजत नागरिकांनी नृत्य केले. यात महाविद्यालयीन तरुणांचा समावेश सर्वाधिक होता.
खमंग पदार्थांची मेजवानी
रिसॉर्टवर येणाऱया नागरिकांना खमंग पदार्थांची मेजवानी मिळाली. वाढत्या उष्म्यापासून शरीराला थोडासा थंडावा मिळावा यासाठी कोकम सरबत व थंडाई दिली जात होती. नाष्टय़ासाठी भुजीया, दही भल्ले, मालपुवा, समोसे यासह इतर पदार्थांचा नागरिकांनी आस्वाद घेतला.
दुपारी शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांची रेलचेल या कार्यक्रमात होती. त्यामुळे नागरिकांनी डिजेवर थिरकण्यासोबतच खमंग पदार्थांवर ताव मारला.