बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथे पोलिसांनी अक्षरशः रक्ताच्या थेंबांचा मागोवा घेत लपलेल्या खुन्याला शोधून काढले आहे. एका स्थानिक वादातून हे हत्याकांड घडले होते. 45 वर्षीय मातादेवी हिची तिचा शेजारी बिट्टू शाही याने सुऱयाने गळा कापून हत्या केली. ही महिला घरात एकटीच रहात असे. तिचा पती बेतत्ता आहे तर मुले इतर गावी कामासाठी राहतात.
आरोपी युवक शाही हा तिचा शेजारी होता. दोघांचा काही कारणामुळे वाद झाला. त्याचे पर्यवसान तिच्या खुनात झाले. हे वृत्त गावात वाऱयासारखे पसरल्यानंतर गावकरी महिलेल्या घरी एकत्र जमले तथापि, खुनी युवक तोपर्यंत पळून जाण्यात यशस्वी ठरला. तो पळत जात असताना त्याच्या सुऱयाला लागलेले रक्त थेंबाथेंबाने ठिबकत होते. तो ज्या जागी लपला होता तेथपर्यंत हे रक्त ठिबकत होते. पोलिसांनी याच रक्ताच्या थेंबांचा मागोवा घेत लपलेल्या खुन्यापर्यंत मजल मारली आणि त्याला जेरबंद केले. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली म्हणून रक्ताच्या थेंबांच्या खुणा ताज्या असताना त्यांना आरोपीचा शोध लावता आला.
एका आरोपीचा शोध लागल्याने अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे प्रसंगावधान आणि तत्काळ कृती यांचे राज्यभर कौतुक होत आहे.