प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरासह खंडाळा येथील मुलींची फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी केल़ी तसेच अश्लिल फोटो देखील अपलोड केले होत़े दरम्यान दोघांनाही या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने आपले फेसबुक अकाऊंट बंद केल़ी त्यामुळे फसवणूक होण्यापासून या दोन्ही मुली बचावल्या.
रत्नागिरीतील नामवंत वकिल भावे यांच्या मोबाईल हॅकिंगचे प्रकरण ताजे असतानाच आता फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आल़ा खंडाळा येथील राजेंद्र भडसावळे यांच्या पत्नी व मुलीचे अकाऊंट अज्ञातांनी हॅक केल़े यावेळी हॅकर्सने भडसावळे यांनी मुलीच्या फेसबुक मेसेंजरवरून मित्रांना मेसेज पाठवून आपल्याला मदतीची गरज आह़े त्यासाठी 10 हजार रुपये गुलल पे करा असा मेसेज पाठवल़ा
दरम्यान मित्रपरिवाराकडून भडसावळे यांच्याशी संपर्क साधण्यात आल़ा यावेळी हा प्रकार उघडकीस आल़ा तसचे भडसावळे याच्या मुलीच्या मैत्रिणींशी देखील हॅकर्सने संपर्क साधल़ा यावेळी विविध कारणे सांगून मोबाईलवर येणारा ओटीपी नंबर सांगा अशी बतावणी करण्यात आल़ी मात्र या सर्व प्रकाराचा भडसावळे यांना संशय आल्याने त्यांनी कोणतेही माहिती देण्यास नकार दिल़ा तसेच आपले फेसबुक अकाऊंट बंद केल़े त्यामुळे होणारी फसवणूक देखील टळल़ी
असाच प्रकार रत्नागिरी शहरातील चांदोरकर मसाले उद्योग यांच्या बाबतीतही घडल़ा त्यांच्या नातेवाईकांचे देखील फेसबुक अकाऊंट अज्ञाताकडून हॅक करण्यात आल़े तसेच आपण अडचणीत आहे. आपल्याला पैशाची गरज आहे अशी विनवणी या मसेजमधून करण्यात आल़ी मात्र हा प्रकार या व्यवसायिकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने आपल्या मित्र परिवाराला कळवून फेसबुक अकाऊंट बंद केल़े