प्रतिनिधी / देवरुख
आंबा घाटात १२ मार्च रोजी सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या खुनाची उकल करण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह लांजा देवराई येथील प्रकाश भोवड याचा होता. आसपास कोणताही पुरावा नसताना केवळ मृताच्या अंगावरील शर्टावर असलेल्या लोगोच्या साहाय्याने पोलिसांनी याची उकल केली.
या प्रकरणी रुपेश दयानंद कोत्रे आणि सतीश पालये ( लांजा ) यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी निवास सांळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक निशा जाधव, स. पो. नि. तुषार पाचपुते, शरद पवार, श्री चौधर, हेकॉ. भुजबळराव, पोना बरगाले, सडकर, तडवी, जोयशी, पवार यांनी या प्रकरणाचा छडा लावला.