मौजे दापोली / वार्ताहर
दापोली तालुक्यात केळशी येथे बुडालेल्या बोटीतील दोन बेपत्ता खलाशांपैकी शादत बोरकर (55) या एका खलाशाचा मृतदेह केळशी किनारा मोहल्ला परिसराजवळ रविवारी सकाळी सापडून आला आहे. दुसऱ्या बेपत्ता खलाशी गनि इस्माईल खमसे-५2 हा खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचे शोधकार्य चालू असल्याचे दापोली पोलिसांकडून सांगण्यात आले.
दापोली पोलीस व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मकबूल शेखअली चाऊस यांच्या मालकीची माशा अल्ला ही बोट एकूण 6 जण व व इतर 8 बोटी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान भारजा नदीच्या खाडीतून समुद्रात जात असताना मोठी लाट आली. बचावासाठी एकदम वळण घेत असताना माशा अल्ला बोटीवर लाट आपटून बोट पलटी झाली. यामधील बोट मालक मकबूल शेखअली चाऊस, सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे चारजण बोटीबाहेर फेकले गेले. बोट पलटी झाल्याचे समजतात दुसऱ्या बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारून त्या चार जणांना वाचविण्यात यश आले. परंतु, इतर दोन शादत इब्राहिम बोरकर व गणी इस्माईल खमसे हे बोटीखाली सापडल्याची दाट शक्यता होती. शनिवारी रात्र झाल्याने शोधकार्य स्थानिक लोकांच्या मदतीने चाललेले थांबविलेले होते.
परंतु किनाऱ्यावर रात्रभर स्थानिक लोकांच्या मदतीने मिळून न आलेल्या दोघांसाठी शोधकार्य ठेवण्यात आले होते. त्यातील शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह रविवारी सकाळी बोटीच्याच जाळ्यात सापडला आहे. तर गणी खमसे अजून बेपत्ता आहेत. बेपत्ता गणी खमसे याचा शोध दापोली ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व ग्रामस्थ घेत आहेत.