‘तरुण भारत’ने केले होते स्टिंग ऑपरेशन ‘तरुण भारत’ इफेक्ट
प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील कोंढे येथील 25 एकरातील बेसुमार वृक्षतोडचा ‘तरुण भारत’ने पर्दाफाश केल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे. यामुळे ‘तरुण भारत’वर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या प्रकरणी जमीन मालक प्रसाद हळदणकर, बेकायदा झाडेतोड करणारा ठेकेदार महेश भुवड व प्रत्यक्ष झाडे तोडणारे 10 कामगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला असल्याचे दापोलीचे वनपाल एस. एस. सावंत यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. या नंतर त्यांच्यावर किती दंड आकारायचा ती रक्कम निश्चित होणार आहे. या कारवाई त्यांना वनरक्षक जी. एम. जळणे यांनी सहकार्य केले.