रत्नागिरी/प्रतिनिधी
आज सकाळी प्राप्त माहितीनुसार हर्णे, तालुका दापोली येथील एका 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी 7.45 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 झाली आहे.
बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1746 झालेली आहे.
याचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 21
कामथे 11
कळंबणी 17
दापोली 3
रायपाटण 1
लांजा 1