रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून आज जिल्ह्यात 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधल्या एका नर्सिंग विद्यार्थिनींचा समावेश आहे. खेड1, मंडणगड 1, चिपळूण 1 आणि रत्नागिरी 1 असे चार रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यातील 3 जण मुंबई प्रवास करून आलेले आहेत तर संबंधित नर्स ही काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या राजीवडा येते तपासणी करण्यास गेली होती.