18 रूग्णांची कारोनावर मात
एकूण रूग्णसंख्या 8 हजार 918
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यामध्ये 13 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा घट होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 918 इतकी झाली आहे तर 18 रूग्ण कोरोनापासून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या 193 कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 3 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 10 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 3, दापोली 3, संगमेश्वर 3 व राजापूर येथे 4 असे रूग्ण आढळून आले आहेत़ मंगळवारी कोरोनापासून बरे झालेल्या 18 रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 414 वर पोहचले आहे. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.34 इतके आहे.
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 89, खेड 51, गुहागर 12, दापोली 33, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 03 असे एकूण 322 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्ये झाला आहे.