प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ४ वर पोहोचली आहे. आज ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ११७ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ८८.९१ आहे. आज संगमेश्वरमधील ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या २९३ वर पोहोचली आहे. मृतांची टक्केवारी ३.६६ टक्के इतकी आहे.
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
राजापूर ३
चिपळूण ९
रत्नागिरी ५
एकूण १७
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
रत्नागिरी ३
चिपळूण ४
खेड ३
दापोली २
गुहागर २
एकूण १४