प्रतिनिधी / संगमेश्वर
मुबंई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे धोकादायक वळणावर कंटेनर उलटून चालक जखमी झाला आहे तर अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी आठ वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला असून चालक उदय प्यारे अंगद पासवान जखमी झाला आहे कंटेनर गोवा ते मुंबई जात होता. अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.