प्रतिनिधी / खेड
योग फाऊंडेशन ऑफ इंडिया व उपकनिष्ठ, कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् चॅम्पियन आयोजित ऑनलाईन योगासन स्पर्धेत भरणे बाईतवाडी येथील अनुष्का म्हातले हिने तृतीय क्रमांक पटकावल्याने तिची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१२ वर्षाखालील मुलींच्या गटात इ. ६ वीत शिकणाऱ्या अनुष्काने सहभाग नोंदवला होता. योग कौशल्याचे कसब दाखवून तृतीय क्रमांक मिळवला. यापूर्वीही राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिला योग प्रशिक्षक गौरव आंब्रे, श्रेयस पाटणे, क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्था चेअरमन बिपीन पाटणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेक्रेटरी पराग चिखले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.