खेड /प्रतिनिधी :
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एम आर फार्म या केमिकल कंपनीच्या बाॅयलरमधील तापमानात वाढ झाल्याने लागलेल्या आगीत कंपनीतील केमिकलचे ड्रमने पेट घेतला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून कंपनीचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
आगीचे वृत्त कळताच मदत ग्रुप, लोटे औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन एक तासाच्या कालावधीनंतर आग विझविण्यात यश आले. दरम्यान, आग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने कंपनीकडे कोणतीही आवश्यक ती यंत्रसामुग्री नसल्याचे दिसून आले. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे