प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील चवंडे वठार समुद्रकिनारी रविवारी सकाळी मृत डॉल्फिन मासा आढळून आल़ा स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास ही बाब आल़ी 5 फूट लांबी असलेल्या या माशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेले नाह़ी दरम्यान या घटनेची खबर प्रशासनाला देण्यात आल़ी
रविवारी सकाळी चवंडे वठार येथे आढळून आलेल्या डॉल्फिन माशाची माहिती संबंधित विभागाला देण्यात आल़ी मात्र यावेळी समुद्रकिनारी बघ्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी देखील जमली होत़ी हा मासा नुकताच मृत झाला असल्याचे दिसून येत होत़े मात्र त्याला कोणता आजार झाला होता की मासेमारी करणाऱया जाळ्यात अडकून या माशाचा मृत्यू झाला याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत़
गेल्या काही दिवसांपासून डॉल्फिन मासे मृत अवस्थेत समुद्रकिनारी आढळून येत आह़े दापोली तालुक्यातील पाळंदे व सालदुरे समुद्रकिनारी अशाच प्रकारे मृत अवस्थेत डॉल्फिन मोस आढळून आले होत़े वारंवार घडणाऱया घटनांमुळे जीवप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात आली आह़े माशांचा मृत्यू कोणत्या व्हायरसमुळे झाला आहे की या माशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने मृत्यू होत आहेत याबाबत शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आह़े