मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीवर गेल्या काही महिन्यात मोठा परिणाम झाला आहे. गेल्या जूनमध्ये निर्यात 34 टक्क्मयांनी घसरली आहे. जून महिन्यामध्ये रत्न आणि दागिन्यांची निर्यात 12 हजार 333 कोटी रुपयांची झाली आहे. मागच्या वषी हीच निर्यात 18 हजार 951 कोटी रुपयांची होती. कोरोनामुळे रत्न आणि दागिन्यांची मागणी मोठय़ा प्रमाणात घटली आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये सध्याला व्यवसायाच्याबाबतीत अनेक निर्बंध लादले गेल्याने व्यवसायांच्या प्रगतीवर मोठा परिणाम झाला आहे. दागिन्यांना मागणीच नसल्याने निर्यातीवर थेटपणे परिणाम दिसून येतो आहे. दरम्यान चीन, युरोपसारख्या देशांमध्ये मात्र थोडय़ाफार प्रमाणात दागिन्यांना मागणी वाढताना दिसते आहे.